Wednesday, May 17, 2006

पाय-वाट




करू करू म्हणता म्हणता खूप दिवस चर्चिला जाणारा trek या वेळी नक्की होणार असं वाटायला लागलं....

एप्रिलच्या सुमारास US मधे असतानाच सहजच विषय निघाला .... कुठे तरी भटकायला जायला पाहिजे ..... रोजच्या routine चा जाम वैताग आला आहे.....

पहिलाच option एकदम जबरदस्त होता

कात्रज - ते - सिंहगड !!!!


पुण्यात परतल्या परतल्या calendar check केलं....... १४ मे बुध्द पोर्णिमा त्यातून शनिवार म्हटला वा योग तर मस्तच जुळून आला आहे....... अगदी १ दिवस इकडे तिकडे झाला तरी हरकत नाही...... शेवटी १३ मे चा दिवस ठरला..... शुक्रवारची रात्र ... चौदवी का चान्द माझ्या कानात रफ़ी गुणगुणायला लागला.....

मी आणि आनंद नक्की होतोच .... संतोष, आशिश, अभिषेक लगेच तयार झाले.... बोलता बोलता सुनिल पण येतो म्हणाला....तसं पहाता हा प्रचंड प्रतिसाद होता..... अगदी आदल्या दिवशी अतुल आणि प्रसाद पण हो म्हणाले ......नेमकी आशिशची US trip plan झाल्याने एक आठवडा आधी १ खंदा शेर्पा कमी झाला. पण काही हरकत नाही..... ७ is not bad number :-)


planning करून ९ वाजता स्वारगेटला भेटायचा ठरले पण अभिषेक आणि सुनिल परिहार चौकात अडकल्याने मी संतोष सुनिल आणि अभिषेक, ९ ला आनंदकडे पोहोचलो आणि ९:४५ ला स्वारगेटला आम्ही आणि अतुल व प्रसाद सगळे भेटलो. कोंढाणपूरला १० ची शेवटची गाडी होती... १०:४५ ला कात्रज बोगदा गाठला.
बिर्यानी बांधून आणली होती ती बोगद्य़ा समोर बसून हाणली..... आणि बर्रर्रर्रप अशी आरोळी ठोकून sharp ११ ला trekking ला सुरूवात केली.


प्रत्यक्ष कोणी हा trek आधी केलेला नसल्याने हाती असलेली theory आणि ध्वनी भ्रमण यंत्रावर घेतलेला तज्ञाचा सल्ला गाठीशी बांधून पहिलं टेकाड चढायला सुरू केली. बोगद्य़ाच्या माथ्यावरचं मंदिर हा पहिला पडाव होता. पहिलाच चढ अगदी perfect warmup होता. मंदिरामधील देवीचा दर्शन घेतला आणि हत्ती टेकडी कडेमोर्चा वळवला. पौर्णिमेच लख्खं चांदणं पडलं होतं.... एकदम आकाशात tubelight लावल्यासारखं वाटत होतं....

अजून सिंहगडाचा दर्शन झाला न्हवतं.... त्यामुळे पुढे काय आहे याचा काहीच अंदाज लागत न्हवता ..... पहिला डोंगर माथा गाठला तरी सिंहगडाचा पत्ता नाही......


"पहिला चढ अवघड आहे नंतर एकदम flat आहे" --- विशेष टिप्पणी from आनंद

मग त्या flat च्या शोधात आम्ही अजून एक टेकाड चढलो.... तेव्हा कुठे सिंहगडचा tower दिसू लागला. आणि दिसू लागल्या सिंहगड आणि आमच्या मधे उभ्या असलेल्या २ - ३ टेकड्या.....
एकूण अंतर किती आहे हे कोणालाच माहित न्हवतं .... अभिषेक यावा म्हणून ते अंतर १५ - २० कि.मी. आहे असं बळच सांगितल होतं .....

आता केवळ एकच ध्यास होता सिंहगड.......दिसली टेकडी की कर चढाई आणि उतर टेकडी..... नुसता रतीब सुरू केला..... आणि तो १ सरळ सोट उतार आला. समोर पायवाट दिसत होती पण ती गाठावी कशी या विचारात सगळे होतो...... थोडा निरीक्षण केल्यावर डावी उजवी मारून ऊतरता येईल असा अंदाज आला..... संतोष पुढे सरसावला मग आनंद मागे मी नतंर सुनिल अतुल आणि शेवटी प्रसाद ..... एकच उतार पण तब्बल एक तास गेला........

१२ वाजून गेल्याचे लक्षात आले आणि घाटंमाथ्यावर एकच जल्लोश झाला..... Happy birthday सुनिल.....

मग पुढे आनंदच्या flat शोधत शोधत सगळे जण एक डोंगर चढायचा आणि एक ऊतरायचा अशी मार्गक्रमणा करत होतो ..... अधून मधून सिंहगडचा tower दिसत होता ... आणि समस्त trekker जनता एकच ध्येय एकच ध्यास घेऊन चालत होते......

"मधे एक tar road लागेल.... मग तिथून फ़क्त ५ कि.मी. रस्त्यावरून चालायचे आहे" --- आनंदची पुढची टिप...... लागले सगळे tar road शोधायला.....

गप्पांना तर एकदम मस्त चालू होत्या...... ४ - ५ टेकड्या झाल्यावर जवळ जवळ सगळ्यानाच श्वास लागयला लागला होता.... मग पहिला पडाव पडला.... म्हणजे public अक्षर्शः आडवं पडलं. कैरी आणि संत्र्याची एक round झाली आणि सगळे शेर्पा refresh झाले.

आमच्या पुढे एक मोठा group चालला होता... त्यांच्या batteriesचे झोत अधून मधून दिसत होते... आणि पायवाट होतीच.... रस्ता बरोबर आहे तर !!!

बाकी काही नाही तरी अभिषेक आणि संतोष, पायवाट आणि पांढरा एवढे २ मराठी शब्द शिकले......

एक चढ चुकवायच्या प्रयत्नात आम्ही पायवाट सोडून थोडे भरकटलो होतो पण वाई वरून सातारा करत परत मूळ पायवाटेवर आलो :-) trek मधे भरकटण्याच थोडा आनंद मी समस्त जनतेला मिळवून दिला आणि येथेच्छ शिव्या खाल्ल्या :-)) थकलेल्या पायांनी दुसरा पडाव टाकला..... सुनिलने मस्त शेंगदाणे-गूळ आणले होते...... आणि बाकी संत्री सफ़रचंद अशी फ़ळफ़ळावळ होतीच !!!!

अजूनही आनंदचा flat आणि tar road आलाच न्हवता..... अंदाजे ६०% trek झाला असावा अशी एक सूचना झाली आणि तब्बल ४०% शिल्लक आहे या जाणीवेने सर्वानी अजून थोडावेळ थांबू असा ठरावल पास केला....

एकेकाचे पाय आता मी म्हणायला लागले होते...... आनंदच्या पायात cramp आल्याने त्याने भरपूर पाणी प्यावं असा सल्ला काही तज्ञानी दिला (अर्थातच त्यात मी १ होतो ;)) पण शेवटी त्याने एवढे पाणी प्यायले की पाण्याने त्याच्या पोटात कळा यायला लागल्या.....

अखेर आमच्या पुढचा Amdocचा group एका उतारावर आम्ही मागे टाकला...... तब्बल ४०-४५ जणांचा तो जथा रात्री ९ वाजल्यापासून कात्रजवरून निघालेला होता.... अर्थातच मुली असल्याने १ group पुढे आणि दुसरा मागे अशी फ़ूट पडली होती..... पण सगळ्यांच्या हिमतीची दाद द्यायला हवी..... एवढा मोठा group अशा जबरदस्त मोहीमेवर नेणे म्हणजे प्रत्यक्ष किल्ल्यावर चढाई करण्यासारखेच होते.....

चंद्रास्त व्हायला आला होता आणि एक मोठी दरी उतरून अजून एक डोंगर चढायचा होता.....batteries मधे नवे cell टाकून आम्ही सज्ज झालो....

आता सुनिल पण दमला होता..... एक एक पाऊल ऊचलून ऊचलून टाकत होतो ... जरा १० पावलं चढल्यानंतर बसत होतो..... एकूणातच हा trek physically solid demanding आहे हे निर्विवाद सिध्द झाले :-)

असे अजून २-३ trek केले तर पुढच्या वर्षी हिमालयात नक्की trek करता येईल !!!!

आता सिंहगड अगदी डोळ्यासमोर होता आणि पायात मोठे मोठे दगड बांधले आहेत असं पण वाटत होतं..... एव्हाना चांगलच उजाडलं होत.....

अतुलने declaration दिलं.... tar road लागला की तडक rikshaw पकडणार आणि घर गाठणार..... आता आमचे पण २ group झाले..... अतुल आणि प्रसाद सुर्योदयाचे photo काढायला मागे थांबले ते शेवटी मागेच राहिले.......

शेवटचा अगदी खडा डोंगर ऒलांडला आणि much awaited tar road दिसायाला लागला.....झपा झप पावल उचलत आम्ही तो पल्ला गाठला.......

समोरून जात असलेल्या tractor वाल्याला सहज सांगितले "jeep असेल खाली गावात तर द्या पाठवून"....

आणि १० मिनीटात जीप आमच्यासमोर :-) चला काम फ़त्ते आता नक्की सिंहगड गाठूनच परत जाणार !!!!

देव टाक्याचे गार गार पाणी ती खमंग भजी......मडक्यातले दही, ताक.... solid मजा आली.... एकदम जबरीच !!!!!

तीच jeep पकडून थेट आनंदच घर गाठलं आणि बरेच दिवसचे pending trek च स्वप्न पूर्ण झाले :-)

दरम्यान अतुल आणि प्रसाद चालत चालत घाट खाली ऊतरून six seater पकडून धायरी फ़ाटा राजाराम पूल मार्गे rikshaw ने घरी पोहोचले...... अतुलने office मधून गाडी घ्यायचे पण कष्ट घेतले नाहीत :-)

पुढचे २ दिवस समस्त शेर्पा मंडळी आपापले पाय शोधत विश्रांती घेत होते ......

आता परत एकदा सह्याद्रीच्या रिकाम्या टेकड्या खूणावत आहेत....

चला मावळ्यानो तयार व्हा......

गर्जती सह्याद्रीचे कडे ..........!!!!!