Tuesday, June 21, 2011

K2S (अर्थात कात्रज ते सिंहगड)

K2S (अर्थात कात्रज ते सिंहगड)

Monsoon चे trek सुरू करायचे असा विचार चालू असतानाच office मधे आनंद, अजित, अभिजीत luch time च्या सुमारास भेटले आणि शनिवारी सकाळी K2S चा plan झाल्याचे समजले.

मी टपूनच होतो असा काही घडायची वाट पहात.... लगेच हो म्हणालो..

शनिवारी सकाळी ५:५५ च्या आसपास साधारण १४ जण स्वारगेट च्या २ wheeler stand जवळ जमा झालो.
भोरला जाणा-या ST च्या कंडक्टरने उगाच रुबाब दाखविल्याने आम्ही पी एम पी कडे मोर्चा वळवला.

६:१५ ला कल्याण ला जाणारी बस येणार असल्याची खबर होती. बस स्वारगेट ला पोहोचताच आनंदला सचिनचा फोन आला.
तेवढ्यात चालक महाशय खाली उतरले. त्यामुळे सचिन आरामात बस मधे पोहोचला.

कात्रज बोगद्याच्या पलीकडे ४ जण आमची वाट पहातच होते. फ़ोटोचा झटपट कार्यक्रम उरकून बोगदयाच्या टपा च्या दिशेने चढायला सुरुवात केली.
आनंदचे cycling, swimming, trekking मधे बरोबर असणारे आणि आमच्या trek साठी आलेले ३ खास guest trekkers आणि मी असा आमचा ५ जणांचा group जमला.
हत्ती टेकडीच्या double hump वर पोहोचे पर्यंत generation "Youngistan" जरा मागे पडले.
अगदीच उदघाटनालाच फ़ाटाफ़ूट नको म्हणून जरा सगळे पुढे येई पर्यंत थांबलो.
एव्हाना गप्पांना चांगलाच ऊत आला होता. सगळा माहोल एकदम मस्त जमला होता.
जर काही कमी होते तर फ़क्त पावसाची अगदीच वानवा होती.
पण पुढे सिंहगड येई पर्यंत थोडा फ़ार रिमझीम पाऊस पडावा अशी आशा होती.

साधारण ८:३० च्या सुमारास breakfast ब्रेक घ्यायचा ठरले. एव्हाना ३-४ subgroup बनले होते. सगळे जमा झाल्यावर असे लक्षात आलं की नितीन खूपच मागे राहीलाआहे. थोड मागे जाऊन पाहीले तर तो तब्बल २ टेकड्या मागे होता.  सगळ्यांची पोट पूजा झाल्यावर आनंदने सहज मागे जाऊन पाहिले तर नितीन रस्ता चुकून भलती कडेच ऊतरत होता.

"Youngistan" ला पुढे पाठवून आमचा ५ जणांचा group नितीन साठी थांबला. "पुढे येणारी प्रत्येक टेकडी चढायची आणि पुढची सिंहगडाच्या दिशेने जाणारी पायवाट पाहून मगच पुढे जायचे" असा कानमंत्र देऊन आम्ही परत वाटचाल चालू केली.

गप्पांमधे १ पुस्तक काढायचं ठरल "K2S - गड नेहमीच येतो पण सिंह मात्र जातो".
पण पुस्तकात काहीच न लिहीता फ़क्त अनुक्रमणिका बनवावी अशी एक भन्नाट कल्पना पुढे आली कारण "All is in mind - so read thru your mind" .

१. Trekkerचा R.D.Burman होणे
२. हार्मोनियम
३. तुझा उपास आहे का?
४. उपास नाही तर अंडे खा !!!
५. फ़क्त ४ टेकड्या आहेत
६. त्यात फ़क्त १च अवघड टेकडी आहे
.
.
.
आणि शेवटचा खंड
xx. The गड


अशा अनेक गमती गप्पा गोष्टी करत करत ११:३० च्या सुमारास technically trek संपला - म्हणजे रस्ता आला.

मग पुढे रस्त्याने पुणे दरवाजा गाठला. नानांकडे मस्त special लिंबू मीठाचे सरबत प्यायलो. मी तर चक्क ४ ग्लास सरबत ढोसलं.
१:१५ ची बस असावी असा अंदाजे मी पुडी सोडली म्हणून लगोलग आम्ही आतकरवाडी गाठली. पण बस तर २ वाजता होती.

कॆरीचे पन्हं, कोकम सरबत, चहा असा एक round झाला.
तेवढ्यात एका सुंदर kingfisher (पक्षाने) दर्शन दिले.
अखेर १ टकाटक बस आली, परंतू वाहक चालक द्वयाने जेवणाचा पण जाहीर केला.
परत एकदा आम्ही हॊटेलचा आसरा घेतला.
शेवटी एकदाची बस आली आणि आम्ही पुण्याच्या दिशेने कूच केले.

trek तर छान झाला पण पाऊस न मिळाल्याची खंत तेवढी राहिली.
असो काही हरकत नाही परत पुन्हा एकदा छान पावसात करूच K2S !!!!

जय महाराष्ट्र ॥